गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : खासदार संदीपान भुमरे

Foto
दादेगाव येथे खासदार यांच्या हस्ते सिमेंट बंधारा व सिमेंट रस्ता भूमिपूजन उत्साहात

पैठण, (प्रतिनिधी) : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन खा. संदीपान भुमरे यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग १६ ते दादेगाव बु.खु ते. कुतूबखेडा रस्ता लोकार्पण सोहळा, सिमेंट बंधारा व सिमेंट रस्ता भूमिपूजन सोहळा खासदार संदीपान भुमरे यांच्याहस्ते मंगळवारी रोजी सकाळी झाला.

याप्रसंगी आमदार विलास भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, श्री रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नंदकुमार पठाडे, संचालक आप्पासाहेब निर्मळ, जिल्हापरिषद सदस्य अभिजीत तवार, राज्य दूध संघाचे संचालक नंदू अण्णा काळे, शेतकरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबुराव पडुळे, महिला आघाडीच्या पुष्पा गव्हाणे, ज्योती काकडे, अनिल हजारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते, पुढे बोलताना खा. संदिपान भुमरे म्हणाले की, गावातील रस्ते, पाणीपुरवठा, शेतीसाठी सिंचन सुविधा, शैक्षणिक व आरोग्य सुविधा या सर्व बाबींमध्ये दर्जे दार कामे व्हावीत, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी आमदार विलास भुमरे यांनी असे म्हटले की, हा रस्ता पूर्णत्वास गेल्याने परिसरातील नागरिकांची दळणवळण व्यवस्था अधिक गतिमान होणार आहे. शेतमालाची वाहतूक सुलभहोईल, विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाणे सोपे होईल आणि आपत्कालीन सेवांसाठीही जलद संपर्क साधता येईल. सिमेंट बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढून शेतीसाठी आवश्यक असलेला जलसाठा उपलब्ध होणार आहे, 

ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. तसेच सिमेंट रस्त्यामुळे गावातील चिखलमुक्त, सुरक्षित आणि टिकाऊ रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून अशा अनेक विकासकामांना गती देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. ग्रामीण भागाचा विकास हा केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कामांवर आधारित असावा, असे सांगत त्यांनी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ग्रामस्थांच्या विश्वासामुळेच विकासकामांना गती मिळत असून भविष्यातही अशीच विकासयात्रा सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 यावेळी खरेदी विक्री संघ संचालक अनिल हजारे, राजेंद्र वाघमोडे, पंचायत समिती सदस्य उदयशेन काळे, भाऊसाहेब गोजरे, श्याम तांगडे, रेवण कर्डीले, डी. डी. जाधव, भाऊसाहेब वाघ, सरपंच उषा उद्धव हजारे, महादेव हजारे, भाऊसाहेब हजारे, देविदास हजारे, अविनाश हजारे, योगेश गव्हाणे, पांडुरंग हजारे, सुदर्शन हजारे, आबासाहेब हजारे, परसराम हजारे, रविंद्र हजारे, संदिप हजारे, नारायण हजारे, बापू गहाळ, मुरलीधर गहाळ, भरत थोटे, महेश थोटे, शहाजी झिने, शंकर सातपुते, प्रल्हाद गहाळ, किरण वाहूळे, सचिन झिने, नारायण येरे, संदिप सातपुते, राम हजारे, मनोज हजारे, अशोक भुकेले यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.